उपनयन एक संस्कार
मग संस्काराची व्याख्या शोधता शोधता मुंज केल्याने खरंच माझा मुलगा संस्कारी होणार आहे का हा विचार करावा असे वाटू लागलं.
गाडीवरून जात असताना बऱ्याचदा एक पोस्टर नेहेमी दिसायचं पाटणकर खाऊ वाल्यांचं... काय तर ह्मणे 5D मुंज. काय प्रकार आहे तो माहीत नाही आणि माहित करून घ्यायाची गरज पण वाटली नाही. पण हा.. सर्वसाधारणपणे मराठी कुटूंबात मुंज कशी होते हे माहीत होतेच.
पूर्वीच्या काळी अत्यंत सुंदर असा हा केला जाणार संस्कार मुंज. त्या मुलाची शैक्षणिक आयुष्याची सुरवात जी मुळात 8 व्या वर्षी सुरु व्हायची .ते मूल गुरुगृही जाऊन विद्या शिकण्यास सुरुवात करी. आता आपली हि शैक्षणिक आयुष्याची सुरुवात झाली ह्याची खूणगाठ म्हणजे जानवे. दहा घरी खरोखरीच भिक्षा मागून शिधा शिजवून जेवण बनवीत असे. खरंच सुंदर आणि कालानुरूप आचरण आणि विचार. पण हा विचार आताच्या काळात कितपत लागू आहे? मुळात आजच्या काळात मुलांचे प्राथमिक शिक्षण हे 2.5 वर्षी सुरु होते. बर गुरुगृही राहून शिक्षण पूर्ण करण्याचा प्रश्नच येत नाही. वडील कानामध्ये गुरुमंत्र जो कि असतो गायत्री मंत्र तो ना वडील आजच्या घडीला म्हणत ना ते मूल रोज म्हणाणारे तर त्याला गुरुमंत्र म्हणावा का? ना ते मूल रोज चित्राहुति वाहणारे ना कि संध्या करणारे. त्या 8 वर्षाच्या मुलाला झोळी धरून चार नटलेल्या बायकांसमोर उभे करायच आणि ओम भवती भिक्षां देही म्हणायला लावायचे आणि त्या नटलेल्या तमाम मावश्या आत्या काकू आपल्याला मान दिला ह्या विचाराने सुखावून ते विकतचे लाडू त्या बटूच्या झोळीत टाकणार.
मोठ्या प्रमाणात केल्याजाणाऱ्या मुंजी मध्ये होण्याऱ्या गोष्टी तर सोडाच. हॉल भाडे गिफ्ट ची देवाण घेवाण प्रत्येक विधीला ड्रेस ची बदला बदल, चमचमीत मेनू आणि झिंगाट वर नाचणारी वरात. ह्यावर तर बोलायलाच नको. काही कुटुंब आहेत ही कि जे हे सर्व टाळून अतिशय साध्या प्रकारे मुंज करतात हि.
पण परत प्रश्न तोच कि ह्या सागळ्यांनेच आपले पाल्य खरंच संस्कारी होते का? आणि संस्कार म्हणजे काय तर चार श्लोक अस्खलित म्हणणे?
मुळात सोयीचा वीकएंड बघून मुंज करायची आणि पुढच्या वीकएंड ला आपले सो कॉल्ड गुरु अर्थात वडील त्याच मुलांसमोर मित्र अथवा नातेवाईक यांच्यासोबत वीकएंड पार्टी जोरदार करणार. आता ओली पार्टी कि सुकी हा मुद्दा हि वेगळाच नाही का!
असो! शेवटी आपल्या मुलांच्या बाबतीत निर्णय हा त्या पालकांचा आहे. पण हाच सखोल विचार करताना माझ्या मुलाला संस्कारी कारण्यासाठी मला नक्कीच ह्याची गरज भासणार नाही अशी जाणीव झाली. आणि हा विचार मांडावासा वाटलं इतकच.

Comments
Post a Comment