उपनयन एक संस्कार
संस्कार या शब्दाची व्याख्या काय असावी हा विचार मी गेले काही दिवसांपासून करत आहे. पण आई झाल्यावर आपले मूल संस्कारी व्हावे म्हणजे नेमके काय हा विचार मात्र जरा जास्त खोल जाऊन करावासा वाटला. घरी साधारणपणे अनेक विषयांवर चर्चा होत असते त्याप्रमाणे मुलांवर करायचे असलेल्या संस्कारापैकी अत्यंत महत्त्वाचा संस्कार म्हणजे मुंज असे बऱ्याच वेळा माझ्या कानावर पडतच असते. मग संस्काराची व्याख्या शोधता शोधता मुंज केल्याने खरंच माझा मुलगा संस्कारी होणार आहे का हा विचार करावा असे वाटू लागलं. गाडीवरून जात असताना बऱ्याचदा एक पोस्टर नेहेमी दिसायचं पाटणकर खाऊ वाल्यांचं... काय तर ह्मणे 5D मुंज. काय प्रकार आहे तो माहीत नाही आणि माहित करून घ्यायाची गरज पण वाटली नाही. पण हा.. सर्वसाधारणपणे मराठी कुटूंबात मुंज कशी होते हे माहीत होतेच. पूर्वीच्या काळी अत्यंत सुंदर असा हा केला जाणार संस्कार मुंज. त्या मुलाची शैक्षणिक आयुष्याची सुरवात जी मुळात 8 व्या वर्षी सुरु व्हायची .ते मूल गुरुगृही जाऊन विद्या शिकण्यास सुरुवात करी. आता आपली हि शैक्षणिक आयुष्याची सुरुवात झाली ह्याची खूणगाठ म्हणजे जानवे. दहा घ...